* तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा

* तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा..
* अतिक्रमण धारकांना नियमाकुल करून पट्टे द्या..
* "आप" चे एसडीओ मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन सादर...

बिरसा संदेश न्युज...
राजेंद्र आरके / वणी प्रतिनिधी

वणी : येथील अतिक्रमण धारकांना कायम पट्टे मिळालेच पाहिजे. या मुद्द्याला धरून आज दिनांक १२/०६/२०२३ रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब वणी यांचे हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री साहेब यांना आम आदमी पार्टी चे वतीने निवेदन देण्यात आले आहेत.
      बरेच वर्षापासून वणी शहरात अतिक्रमण करून गोरगरीब लोक राहत आहेत. परंतु अद्यापही त्यांना निवासी जागेवर कायम पट्टे मिळालेच नाही. महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून त्यात या धोरणानुसार झोपडपट्टी आहे तिथे विकास करणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे जी आर आहे. 
१) शासन निर्णय क्र.एकईएन-१०/२००१, प्र. क्र.. २२५ /ज-१ मंत्रालय, मुंबई-४०००३२ नुसार.
२) शासन निर्णय क्र.झोपुधो-१००१/प्र. क्र.१२५/झोपसू १ मंत्रालय , मुंबई, दिनांक २२ जुलै २०१४ नुसार.
३)शासन निर्णय क्रमांक : प्रआयो-२०१५/प्र.क्र.१११ गृनिधी २ (सेल) शिबिर कार्यालय नागपूर दि.९डिसेंबर २०१५ नुसार.
४) शासन निर्णय क्रमांक एन. यु. एन २०१८ प्र. क्र.१९७/नवी- १८. मंत्रालय मुंबई दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ नुसार
५) शासन निर्णय क्रमांक : संकीर्य २०१९/प्र. क्र. १५ नवी २६ मंत्रालय मुंबई दिनांक ६ मार्च २०१९ नुसार. वरील प्रमाणे सर्व जीआर असून आजपर्यंत वणी शहरातील अतिक्रमण धारकांना कुठलेही कायम पट्टे देण्यात आलेले नाही किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. या सर्व प्रश्नांना घेऊन आम आदमी पार्टी यांनी बेधडक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकवला. एकीकडे शासन निर्णय काढायचा व तब्बल ३० वर्षापर्यंत त्याची अंमलबजावणी करायची नाही. ही गरीब व शोषित नागरिकांची थट्टा करणे आहे. वणी शहरात शासकीय जागा असून त्या ठिकाणी परवडणारी घरे नगरपरिषद बांधू शकली नाही. तरी दुसरीकडे परवडणाऱ्या घरांना बँकेकडून २.५०,०००/ पर्यंत अनुदान मिळालं नाही केवळ शासन निर्णय काढून तो कार्यान्वित होत नसेल तर त्या शासन निर्णयाचा अर्थ राहत नाही. व जनतेचे हित साध्य होत नाही. असा कठोर प्रश्न आम आदमी पार्टीच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे. या सर्व मागण्यांना घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने वणी विधानसभा मतदारसंघ दादाजी लटारी पोटे(संघटन मंत्री.) व प्रेमकुमार उर्फ निखिल ढुरके (शहर संयोजक / शहराध्यक्ष)यांचे नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस उपस्थित श्री शेख जलील शेख फरिद( उपाध्यक्ष),ॲड.चंदू गणपत राऊत (लिगल सेल अध्यक्ष) श्री संजय जीवने (सचिव) अमजद पठाण (उपाध्यक्ष) सौ राधा जाधव (महिला अध्यक्ष) कु. प्रियंका नाखले (युवा अध्यक्ष) सौ शिल्पा मडावी (महिला सचिव), श्रीकांत एकरे (उपाध्यक्ष) गोपाल पोटे (कामगार अध्यक्ष), कार्यकर्ते तथा नागरिक या मोर्चामध्ये मोठया संख्येने उपस्थित झालेले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी घरावर अधिकार नसला तरी बळजबरीने

वणी नगर परिषद निवडणुकी

वांजरी येथील अनुसुचित जाती व