वणी नगर परिषद निवडणुकी
बिरसा संदेश न्यूज
प्रतिनिधी
वणी :- आज दिनांक १२/१०/२५ ला वणी रेस्ट हाऊस येथे वणी शहरातील आदिवासींची वणी नगरपरिषद निवडणूक संदर्भात सभा पार पडली सभेत बहुतांश युवा आदिवासी वर्गांचा उत्साह आणि सहभाग जास्त प्रमाणात दिसून आला सभे मधे युवांनि आपल्या मनोगतातून एक मताने एक सुराणे आपले सकारात्मक मत मांडले युवांचा मता नुसार आदिवासी नेहमी राजकीय पक्ष्यांचा बांधेल राहिला आहे परंतु आज वणी येथील आदिवासींना स्वतंत्र बने स्व कर्तृत्वावर स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची योग्य संधी आज आदिवासीजवळ चालून आली आहे.
त्याचा फायदा प्रस्थापित राजकारणाला राजकीय पक्षाला करून देण्या पेक्षा स्वबळावर स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करून वणीकर जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणे आणि वणी शहराचा विकास करणे हा एकच उद्देश पूर्ण करण्यासाठी आदिवासी युवकांनी एकत्रित येऊन बांधली वज्रमूठ ह्या युवकांच्या मताला दुजोरा देत वणी शहरातील तालुक्यातील बहुजन चळवळीत सक्रिय सहभागी असणारे आदिवासींनी सुद्धा युवावर्गांच्या मताला सहमती दर्शविली आदिवासी संघटनात कार्यरत असणाऱ्या वैचारिक आदिवासींनी युवाच्या मताला सहमती दर्शविली एकंदरीत उपस्थित सर्वांच्या मते निवडणुकी संदर्भात सकारात्मक परिणाम दिसून आले होते आणि सर्वांनी मिळून पुढील सभेचे आयोजक सुधा करण्याचे ठरवले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा