वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर
बिरसा संदेश न्यूज
वणी प्रतिनिधी
वणी : अमली पदार्थांच्या विक्री व तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वणी पोलिसांनी धडक कारवाई करत 19.27 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ व एक मोबाईल असा एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे 19 जून रोजी रात्री गणेशपूर रोड परिसरात छापा टाकून कौतिक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (वय 28, रा. तेलीफैल, वणी) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिस चौकशीत जप्त करण्यात आलेला एमडी पदार्थ प्रज्यात उर्फ कॉकरोच महेश उपरे (वय 27, रा. तेलीफैल, वणी) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 514/2026 अन्वये कलम 8(C), 21(B), 21 एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित यापूर्वी दाखल असलेल्या गुन्हा क्र. 479/2026 मध्ये सहभागी असलेल्या आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये प्रज्यात महेश उपरे (वय 27), अविनाश विजय पाटील (वय 42, रा. छोरिया ले-आऊट, वणी) आणि रविंद्र धनराज गुप्ता (वय 34, रा. रंगनाथ नगर, वणी) यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रोचिन बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिडुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोउपनि सुयोग महापुरे, पोलीस अंमलदार मोनेश्वर खंडे, नंदकुमार पोपुवार, गणेश मेश्राम, अरविंद बुचे, मृगुन राठोड, श्याम राठोड व निलेश आडे यांनी सहभाग घेतला.अमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करत वणी पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का दिला असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा