नामकरण सोहळा संपन्न
वणी प्रतिनिधी
वणी :- सोमवार दिनांक २ जून २०२६ रोजी पेंदोर व मडावी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला चिरंजीवाचा नामकरण सोहळा उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
सौ. रत्नमाला दिनकर पेंदोर व सौ. सुनीता विठ्ठल मडावी यांचा नातू तसेच सोनू व दीपक यांचा चिरंजीव यांच्या नामकरण सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धार्मिक विधी, मंगलमय वातावरण आणि कुटुंबीयांच्या शुभेच्छांमध्ये बालकाचे नामकरण करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांनी बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेंदोर व मडावी परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शुभेच्छुक : पेंदोर परिवार व मडावी परिवार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा