मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी

मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी बचत गटातील सर्व शेतकऱ्यांना कापूस विकास कार्यक्रमांतर्गत बियाण्यांचे वितरण

बिरसा संदेश 
न्यूज प्रतिनिधी

 वणी :- तालुक्यातील मेंढोली (दि. २५ जून २०२६): केंद्र शासनाच्या कापूस विकास कार्यक्रम (कापूस क्रांती) २०२६–२७ अंतर्गत मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी बचत गटातील सर्व शेतकरी बांधवांची ऑनलाइन पद्धतीने निवड करण्यात आली. या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यास 1.00 हेक्टर क्षेत्रासाठी कापूस बियाण्यांचे वितरण करण्यात आले.सदर बियाण्यांचे वितरण मा. श्री. दिपीप राऊत, तालुका कृषी अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
शेतकरी गटांची निर्मिती करून शेतकऱ्यांनी एकत्रितपणे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊन शेती अधिक फायदेशीर करावी, या उद्देशाने किसान क्रांती या शेतकरी बचत गट तयार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सरपंच सौ सविता वि ढवस उपसरपंच श्री सुभाष कुमरे गटाचे अध्यक्ष श्री भालचंद्र वासेकार सदस्य श्री मनोज काळे, श्री दीपक बल्की, सुरेश भोयर, श्रीराम पाचभाई, श्री गणेश नागतुरे, श्री राजू कुत्तरमारे, श्री प्रवीण ऐकरे, श्री मोरेश्वर वासेकर  यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री. मुकेश पत्रे यांनी वेळोवेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करून कृषि विभागातील योजना शेतकरी बांधवाना मिळवून देण्याकरीता  मोलाचे सहकार्य करीत आहे.याशिवाय गटातील सर्व सदस्यांनी माहिती ऑनलाइन प्रणालीवर नोंदवून अर्ज प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल व या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी शेतकरी बांधवानी शिफारशीनुसार कापूस लागवड, आधुनिक पीक व्यवस्थापन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा अवलंब करून दर्जेदार व अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन  मा. श्री. दिलीप राऊत, तालुका कृषी अधिकारी, वणी यांनी शेतकऱ्यांना केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी घरावर अधिकार नसला तरी बळजबरीने

वणी नगर परिषद निवडणुकी

वांजरी येथील अनुसुचित जाती व