खारी–बिबा मार्गावरील पुलाचे

खारी–बिबा मार्गावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम; मातीमिश्रित साहित्य वापरल्याचा नागरिकांचा आरो
कामाच्या ठिकाणी माहिती फलकाचा अभाव; संबंधित विभाग व ठेकेदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्मेलघाटातील  पुल बांधकामावर भ्रष्टाचाराचे आरोप

बिरसा संदेश न्यूज 
मेलघाट प्रतिनिधी

मेलघाट :- मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात विविध ग्रामीण भागांमध्ये सुरु असलेल्या काँक्रीट पुल व रपटे बांधकामांवर शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असताना, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः जारीदा मार्गे खारी–बिबा रस्त्यावरील पुल बांधकामाबाबत स्थानिक नागरिक व जयस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
सदर पुलाच्या बांधकामामध्ये मातीमिश्रित डस्ट व निकृष्ट दर्जाचे दगड वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे पुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कामाचे अंदाजपत्रक, मंजूर निधी, कामाचा कालावधी व संबंधित कंत्राटदाराची माहिती देणारा फलक नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
संबंधित ठेकेदार व अभियंते यांनी जाणूनबुजून माहिती फलक न लावता नागरिकांपासून माहिती लपविल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच रस्ते व रपटे बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, काही अधिकारी आर्थिक व्यवहारांमुळे निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील आदिवासी नागरिकांनी केला आहे.
खारी–बिबा मार्गावरील पुलाचे बांधकाम मंजूर अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार साहित्य वापरून करण्यात यावे, तसेच संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
बिरसा संदेश न्यूज़ रिपोर्टर कैमरामैन रोहित बेलकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी घरावर अधिकार नसला तरी बळजबरीने

वणी नगर परिषद निवडणुकी

वांजरी येथील अनुसुचित जाती व