शिक्षणाअभावी आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून दूर जाण्याची भीत

शिक्षणाअभावी आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून दूर जाण्याची भीती

प्रतिनिधी

वणी :- आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. मात्र आज अनेक गरीब आदिवासी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार शिक्षण घेणे कठीण होत आहे. सरकारी शाळांची संख्या कमी होत असताना खासगी शिक्षण संस्थांचे वाढते शुल्क अनेक कुटुंबांसाठी परवडणारे राहिलेले नाही.
समाजातील विविध संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. परंतु त्याच निधीतून शैक्षणिक मदत केंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, वाचनालये आणि विद्यार्थी वसतिगृह उभारले गेले तर अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडू शकते. शिक्षणापासून वंचित राहिलेली पिढी समाजाला विकासाच्या प्रवाहापासून दूर नेऊ शकते, अशी चिंता समाजातील जाणकार व्यक्त करत आहेत.
समाजातील प्रत्येक गावात "शिक्षण बचाव समिती" स्थापन करून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, पुस्तके, गणवेश आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी घरावर अधिकार नसला तरी बळजबरीने

वणी नगर परिषद निवडणुकी

वांजरी येथील अनुसुचित जाती व