तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत राजर्षी शाहु महाराज
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावुन मानाचा तुरा रोवला
बिरसा संदेश न्युज
प्रतिनिधि :-
वणी -- येथील सुशगंगा पब्लीक स्कुल मध्ये दि.3 व 4 नोव्हें.2026 रोजी आयोजित 54 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील 90 शाळेतील प्रतिकृती सादर झाल्यात त्यामध्ये राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयाने सहभाग घेऊन "वॉटर सेंसर" नावाची प्रतिकृती सादर केली.
श्री.अभय पारखी,मुख्याध्यापक यांचे नेत्रुत्वात व शिक्षक श्री.तुषार घाने व कु.भाग्यश्री लांडे यांचे मार्गदर्शनात विद्यार्थी कु.कोमल तिवारी,कु.दहीहलीमा शेख यांनी प्रतीकृती सादर केल्या.दोन दिवसीय प्रदर्शनीत झालेल्या परिक्षणात उत्कृष्ट प्रतिकृती व सादरीकरणात परिक्षकांनी राजर्षी शाहु महाराज हिदी विद्यालयाचे प्रतिकृतीला माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक घोषित केला.
शाळेने तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री.ओमप्रकाश चचडा,सदस्य श्री.विक्रांत चचडा,मुख्याध्यापक श्री.अभय पारखी सरांसह सर्व स्तरातुन अभिनंदन केल्या जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा