तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत राजर्षी शाहू महाराज

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचा डंका!

‘वॉटर सेंसर’ प्रतिकृतीला माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक; ९० शाळांमध्ये वणीच्या शाळेची दमदार कामगिरी

बिरसा संदेश न्युज 
प्रतिनिधि :- 

वणी :-  दि. ४ नोव्हेंबर २०२६ : येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाने ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत ‘वॉटर सेंसर’ ही नाविन्यपूर्ण विज्ञान प्रतिकृती सादर करत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सुशगंगा पब्लिक स्कूल येथे दि. ३ व ४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातील ९० शाळांनी सहभाग नोंदवून विविध विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. या प्रदर्शनीत राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. कोमल तिवारी आणि कु. दहीहलीमा शेख यांनी ‘वॉटर सेंसर’ ही प्रतिकृती सादर केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिक्षक श्री. तुषार घाने आणि कु. भाग्यश्री लांडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी या प्रतिकृतीची तयारी केली. दोन दिवसीय प्रदर्शनीदरम्यान परीक्षकांनी प्रतिकृतीची गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सादरीकरणाचे परीक्षण केले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाच्या प्रतिकृतीने उत्कृष्ट कामगिरी करत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मिळविला.
विद्यालयाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याने संस्थेचे सचिव श्री. ओमप्रकाश चचडा, संस्थेचे सदस्य श्री. विक्रांत चचडा, मुख्याध्यापक श्री. अभय पारखी, मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली असून, वणीच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड

घोंसा येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थ्यांची

वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर