पोस्ट्स

मुदत संपलेल्या ठेक्याच्या नावाखाली वसुली सुरूच!

इमेज
मुदत संपलेल्या ठेक्याच्या नावाखाली वसुली सुरूच! नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष की ठेकेदाराची मनमानी? २० लाख ६५ हजार ५०० रुपयांचा ठेका; मुदत संपून दोन महिने उलटले तरी दुकानदारांकडून २० ते ३० रुपयांची वसुली सुरूच! पावती नाही, पैसे न दिल्यास रहल दुकान उचलण्याच्या धमक्या? बिरसा संदेश न्युज  वाणी प्रतिनिधि :-  वणी :-  वणी नगरपरिषदेच्या कर विभागांतर्गत सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी २० लाख ६५ हजार ५०० रुपयांचा ठेका देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, संबंधित ठेक्याची मुदत सुमारे दोन महिन्यांपूर्वी संपुष्टात आली असतानाही शहरातील लहान-मोठ्या दुकानदारांकडून अद्याप वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दुकानदारांकडून २० ते ३० रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जात असल्याचे सांगण्यात येत असून, अनेक दुकानदारांना पैसे दिल्यानंतर अधिकृत पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी पैसे देण्यास नकार दिल्यास दुकानातील साहित्य उचलून फेकून देण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप आहे. छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक भुर्दंड! दिव...

कोळसा प्लॉट स्थलांतराच्या निर्णयाची अंमलबजावणी

इमेज
कोळसा प्लॉट स्थलांतराच्या निर्णयाची अंमलबजावणी करा! २७ ऑक्टोबरला चिखलगाव वाय-पॉईंट येथे रास्तारोको आंदोलनाचा इशारा प्रशासनाच्या ‘नो ऑपरेशन’ निर्णयाची लेखी प्रत व तातडीच्या कार्यवाहीची लाल पुलिया संघर्ष समितीची मागणी बिरसा संदेश न्युज  वणी, यवतमाळ | प्रतिनिधी :-  भारती पेंदोर  वणी :-  तालुक्यातील सोमनाळा ते चिखलगाव चौफुली परिसरातील कोळसा प्लॉट, कोळसा डेपो, ओव्हरलोड वाहतूक आणि प्रदूषणाच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर झालेल्या संयुक्त बैठकीत ‘नो ऑपरेशन’ असा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि लेखी आदेशाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचा आरोप लाल पुलिया संघर्ष समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर कोळसा प्लॉट स्थलांतराच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, संबंधित आदेशाची लेखी प्रत द्यावी आणि प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, या मागणीसाठी मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी चिखलगाव वाय-पॉईंट येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा...

एमआयडीसीतील अवैध मद्यसाठा प्रकरण गाजतेय!

इमेज
एमआयडीसीतील अवैध मद्यसाठा प्रकरण गाजतेय! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; चौकीदाराच्या अटकेनंतर मुख्य सूत्रधार कोण, याबाबत प्रश्नचिन्ह बिरसा संदेश न्यूज  वणी | प्रतिनिधी : भारती संतोष पेंदोर वणी : वणी शहरातील भालर रोडवरील एमआयडीसी परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेला देशी-विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अमरावती विभागीय भरारी पथकाने जप्त केला. या कारवाईत मद्याच्या तब्बल १५ हजार ३९२ बाटल्या आणि महिंद्रा बोलेरो वाहन असा एकूण १२ लाख ६३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गोडाऊनवर चौकीदार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असली, तरी मद्यसाठ्याचा मूळ मालक कोण आणि या अवैध व्यवहारामागे नेमके कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या कारवाईचा तपास पुरवठा साखळीतील मुख्य व्यक्तींपर्यंत पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंद गोडाऊनवर छापा; वाहनात आढळला मद्यसाठा मिळालेल्या माहितीनुसार, भालर रोडवरील एमआयडीसी परिसरातील एका बंद गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा करून त्याचा इतरत्र पुरवठा केला जात असल्याची माहिती राज्य उ...

मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी

इमेज
मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी बचत गटातील सर्व शेतकऱ्यांना कापूस विकास कार्यक्रमांतर्गत बियाण्यांचे वितरण बिरसा संदेश  न्यूज प्रतिनिधी   वणी :- तालुक्यातील मेंढोली (दि. २५ जून २०२६): केंद्र शासनाच्या कापूस विकास कार्यक्रम (कापूस क्रांती) २०२६–२७ अंतर्गत मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी बचत गटातील सर्व शेतकरी बांधवांची ऑनलाइन पद्धतीने निवड करण्यात आली. या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यास 1.00 हेक्टर क्षेत्रासाठी कापूस बियाण्यांचे वितरण करण्यात आले.सदर बियाण्यांचे वितरण मा. श्री. दिपीप राऊत, तालुका कृषी अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शेतकरी गटांची निर्मिती करून शेतकऱ्यांनी एकत्रितपणे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊन शेती अधिक फायदेशीर करावी, या उद्देशाने किसान क्रांती या शेतकरी बचत गट तयार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सरपंच सौ सविता वि ढवस उपसरपंच श्री सुभाष कुमरे गटाचे अध्यक्ष श्री भालचंद्र वासेकार सदस्य श्री मनोज काळे, श्री दीपक बल्की, सुरेश भोयर, श्रीराम पाचभाई, श्री गणेश नागत...

साधनकरवाडीतील रस्त्याच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक;

इमेज
साधनकरवाडीतील रस्त्याच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक; शासन निधीच्या दुरुपयोगाची चौकशी करण्याची मागणी १ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा; सरपंचांकडून स्वतःच्या लेआउटसाठी निधी वापरल्याचा गंभीर आरोप डॉ. शैलेश गजानन आत्राम बिरसा संदेश न्यूज वणी प्रतिनिधी वणी :- तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साधनकरवाडी येथील नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त करत गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तसेच शासनाच्या विकास निधीचा कथित दुरुपयोग करून काही निवडक भागांमध्ये कामे करण्यात आल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. निवेदनानुसार साधनकरवाडी परिसरात डॉ. किशोर मोघे यांच्या घरापासून बुऱ्हाणी यांच्या घरापर्यंतचा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गाच्या बांधकामासाठी ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून नागरिक...

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड

इमेज
अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड हरपला कलाकार... युवा टॅटू डिझायनर राज मेश्राम यांचे हदय विकाराने निधन बिरसा संदेश न्यूज प्रतिनिधी अमरावती :-  बडनेरा शहरातील युवा, प्रतिभावान आणि आपल्या कलेच्या माध्यमातून अनेकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप उमटवणारे टॅटू डिझायनर राज मेश्राम यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर मित्रपरिवार, ग्राहक आणि संपूर्ण बडनेरा शहरावर शोककळा पसरली आहे. टॅटू ही केवळ शरीरावर कोरलेली कलाकृती नसते, तर ती व्यक्तीच्या भावना, आठवणी आणि आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या क्षणांचे प्रतीक असते. राज मेश्राम यांनी आपल्या कुशल हातांनी आणि कल्पकतेने असंख्य व्यक्तींच्या आयुष्यावर अमिट ठसा उमटवला. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत सर्जनशीलता, समर्पण आणि परिपूर्णतेचा ध्यास दिसून येत होता. आज राज आपल्यात नसले तरी त्यांनी रेखाटलेली कला, त्यांनी जिंकलेली माणसे आणि त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी सदैव जिवंत राहतील. कलाकाराचे शरीर नश्वर असते, पण त्याची कला अमर असते. राज म...

खारी–बिबा मार्गावरील पुलाचे

इमेज
खारी–बिबा मार्गावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम; मातीमिश्रित साहित्य वापरल्याचा नागरिकांचा आरो कामाच्या ठिकाणी माहिती फलकाचा अभाव; संबंधित विभाग व ठेकेदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्मेलघाटातील  पुल बांधकामावर भ्रष्टाचाराचे आरोप बिरसा संदेश न्यूज  मेलघाट प्रतिनिधी मेलघाट :- मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात विविध ग्रामीण भागांमध्ये सुरु असलेल्या काँक्रीट पुल व रपटे बांधकामांवर शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असताना, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः जारीदा मार्गे खारी–बिबा रस्त्यावरील पुल बांधकामाबाबत स्थानिक नागरिक व जयस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. सदर पुलाच्या बांधकामामध्ये मातीमिश्रित डस्ट व निकृष्ट दर्जाचे दगड वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे पुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा माहिती फलक लावण्यात आलेला नसल...