नवीन ठाणेदारांकडून वणी करांच्या
नवीन ठाणेदारांकडून वणीकरांच्या मोठ्या अपेक्षा; कठोर कारवाईसह पारदर्शक प्रशासनाची मागणी बिरसा संदेश न्यूज वणी | प्रतिनिधी वणी :- पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर भूमिका, महिलांच्या व युवकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, जनतेशी थेट संवाद आणि प्रशासनात पारदर्शकता यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. वणी शहर व तालुक्यातील बिअर बार, वाईन शॉप, हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय, अवैध दारू विक्री, मटका यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी कारवाईची अपेक्षा व्यक्त होत असली तरी नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ सुरुवातीचा धडाका नको तर सातत्यपूर्ण कृती आवश्यक आहे. याशिवाय रेती तस्करी, कोळसा वाहतूक, अनधिकृत प्लॉटिंग, मुरूम उत्खनन आणि भंगार व्यवसायाशी संबंधित गैरप्रकारांवरही प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, युवकांना सुरक्षित वाताव...