पोस्ट्स

मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी

इमेज
मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी बचत गटातील सर्व शेतकऱ्यांना कापूस विकास कार्यक्रमांतर्गत बियाण्यांचे वितरण बिरसा संदेश  न्यूज प्रतिनिधी   वणी :- तालुक्यातील मेंढोली (दि. २५ जून २०२६): केंद्र शासनाच्या कापूस विकास कार्यक्रम (कापूस क्रांती) २०२६–२७ अंतर्गत मौजा मेंढोली येथील किसान क्रांती शेतकरी बचत गटातील सर्व शेतकरी बांधवांची ऑनलाइन पद्धतीने निवड करण्यात आली. या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यास 1.00 हेक्टर क्षेत्रासाठी कापूस बियाण्यांचे वितरण करण्यात आले.सदर बियाण्यांचे वितरण मा. श्री. दिपीप राऊत, तालुका कृषी अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शेतकरी गटांची निर्मिती करून शेतकऱ्यांनी एकत्रितपणे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊन शेती अधिक फायदेशीर करावी, या उद्देशाने किसान क्रांती या शेतकरी बचत गट तयार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सरपंच सौ सविता वि ढवस उपसरपंच श्री सुभाष कुमरे गटाचे अध्यक्ष श्री भालचंद्र वासेकार सदस्य श्री मनोज काळे, श्री दीपक बल्की, सुरेश भोयर, श्रीराम पाचभाई, श्री गणेश नागत...

साधनकरवाडीतील रस्त्याच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक;

इमेज
साधनकरवाडीतील रस्त्याच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक; शासन निधीच्या दुरुपयोगाची चौकशी करण्याची मागणी १ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा; सरपंचांकडून स्वतःच्या लेआउटसाठी निधी वापरल्याचा गंभीर आरोप डॉ. शैलेश गजानन आत्राम बिरसा संदेश न्यूज वणी प्रतिनिधी वणी :- तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साधनकरवाडी येथील नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त करत गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तसेच शासनाच्या विकास निधीचा कथित दुरुपयोग करून काही निवडक भागांमध्ये कामे करण्यात आल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. निवेदनानुसार साधनकरवाडी परिसरात डॉ. किशोर मोघे यांच्या घरापासून बुऱ्हाणी यांच्या घरापर्यंतचा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गाच्या बांधकामासाठी ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून नागरिक...

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड

इमेज
अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड हरपला कलाकार... युवा टॅटू डिझायनर राज मेश्राम यांचे हदय विकाराने निधन बिरसा संदेश न्यूज प्रतिनिधी अमरावती :-  बडनेरा शहरातील युवा, प्रतिभावान आणि आपल्या कलेच्या माध्यमातून अनेकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप उमटवणारे टॅटू डिझायनर राज मेश्राम यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबीयांवरच नव्हे, तर मित्रपरिवार, ग्राहक आणि संपूर्ण बडनेरा शहरावर शोककळा पसरली आहे. टॅटू ही केवळ शरीरावर कोरलेली कलाकृती नसते, तर ती व्यक्तीच्या भावना, आठवणी आणि आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या क्षणांचे प्रतीक असते. राज मेश्राम यांनी आपल्या कुशल हातांनी आणि कल्पकतेने असंख्य व्यक्तींच्या आयुष्यावर अमिट ठसा उमटवला. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत सर्जनशीलता, समर्पण आणि परिपूर्णतेचा ध्यास दिसून येत होता. आज राज आपल्यात नसले तरी त्यांनी रेखाटलेली कला, त्यांनी जिंकलेली माणसे आणि त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी सदैव जिवंत राहतील. कलाकाराचे शरीर नश्वर असते, पण त्याची कला अमर असते. राज म...

खारी–बिबा मार्गावरील पुलाचे

इमेज
खारी–बिबा मार्गावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम; मातीमिश्रित साहित्य वापरल्याचा नागरिकांचा आरो कामाच्या ठिकाणी माहिती फलकाचा अभाव; संबंधित विभाग व ठेकेदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्मेलघाटातील  पुल बांधकामावर भ्रष्टाचाराचे आरोप बिरसा संदेश न्यूज  मेलघाट प्रतिनिधी मेलघाट :- मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात विविध ग्रामीण भागांमध्ये सुरु असलेल्या काँक्रीट पुल व रपटे बांधकामांवर शासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असताना, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः जारीदा मार्गे खारी–बिबा रस्त्यावरील पुल बांधकामाबाबत स्थानिक नागरिक व जयस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. सदर पुलाच्या बांधकामामध्ये मातीमिश्रित डस्ट व निकृष्ट दर्जाचे दगड वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे पुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा माहिती फलक लावण्यात आलेला नसल...

वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर

इमेज
वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घणाघात; 1.49 लाखांचा मुद्देमाल जप्त बिरसा संदेश न्यूज वणी प्रतिनिधी वणी : अमली पदार्थांच्या विक्री व तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वणी पोलिसांनी धडक कारवाई करत 19.27 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ व एक मोबाईल असा एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे 19 जून रोजी रात्री गणेशपूर रोड परिसरात छापा टाकून कौतिक उर्फ गोलू दिलीप मेश्राम (वय 28, रा. तेलीफैल, वणी) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीत जप्त करण्यात आलेला एमडी पदार्थ प्रज्यात उर्फ कॉकरोच महेश उपरे (वय 27, रा. तेलीफैल, वणी) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 514/2026 अन्वये कलम 8(C), 21(B), 21 एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित यापूर्वी दाखल असलेल्या गुन्हा क्र. 479/2026 मध्ये सहभागी असलेल्या आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये प्रज्यात महेश उपरे (वय 27), अविनाश विजय पाटील (वय 42, रा. छोरिया ले-आऊट, व...

अमरावतीचे माजी आमदार, ज्येष्ठ समाजसेवक

इमेज
अमरावतीचे माजी आमदार, ज्येष्ठ समाजसेवक व शिक्षकांचे लाडके नेते _मा. श्री. बी. टी. उर्फ भाऊराव देशमुख_ यांचे आज दुःखद निधन झाले आहे.  बिरसा संदेश न्यूज  अमरावती (प्रतिनिधी.)       अमरावती :-  त्यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात समाजहित, जनकल्याण आणि विकासासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे.        अमरावतीचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी आमदार, अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि समाजहितासाठी आयुष्यभर कार्य करणारे आदरणीय प्रा. बी. टी. देशमुख सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने अमरावतीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहप्रा. बी. टी. देशमुख सर यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, समाजप्रबोधन आणि लोकसेवेसाठी समर्पित केले. शिक्षक म्हणून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली, तर लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांन...

वणी तालुक्यात वाढत्या भंगार

इमेज
वणी तालुक्यात वाढत्या भंगार चोरीमुळे शेतकरी व उद्योग क्षेत्र चिंतेत बिरसा संदेश न्यूज वणी प्रतिनिधी वणी :- प्रतिनिधी :वणी तालुक्यात सिंचन (एरिकेशन) सुविधा असलेली शेती मोठ्या प्रमाणात असून परिसरात अनेक कोळसा खाणी, डब्ल्यूसीएलच्या प्रकल्पांसह विविध कंपन्या कार्यरत आहेत. याशिवाय शहर व ग्रामीण भागात लहान-मोठी सुमारे ४० भंगार खरेदी-विक्रीची दुकाने असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भंगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, अलीकडील काळात शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलचे साहित्य, बॅटऱ्या, पीव्हीसी व स्प्रिंकलर पाईप, इलेक्ट्रिक केबल, मोटार साहित्य तसेच कंपन्या व खाणींमधील लोखंडी साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. चोरीचा माल विविध मार्गांनी भंगार म्हणून विकला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातून अनेक भंगार व्यापारी व फिरते भंगार खरेदीदार साहित्य गोळा करून वणीतील मोठ्या भंगार विक्रेत्यांकडे विक्री करतात. मात्र, खरेदी केलेले भंगार कायदेशीररित्या मिळवलेले आहे की चोरीचे आहे, याची पडताळणी कितपत केली जाते, असा प्रश्न उपस...

नवीन ठाणेदारांकडून वणी करांच्या

इमेज
नवीन ठाणेदारांकडून वणीकरांच्या मोठ्या अपेक्षा; कठोर कारवाईसह पारदर्शक प्रशासनाची मागणी बिरसा संदेश न्यूज वणी | प्रतिनिधी  वणी :- पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर भूमिका, महिलांच्या व युवकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, जनतेशी थेट संवाद आणि प्रशासनात पारदर्शकता यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. वणी शहर व तालुक्यातील बिअर बार, वाईन शॉप, हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय, अवैध दारू विक्री, मटका यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी कारवाईची अपेक्षा व्यक्त होत असली तरी नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ सुरुवातीचा धडाका नको तर सातत्यपूर्ण कृती आवश्यक आहे. याशिवाय रेती तस्करी, कोळसा वाहतूक, अनधिकृत प्लॉटिंग, मुरूम उत्खनन आणि भंगार व्यवसायाशी संबंधित गैरप्रकारांवरही प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, युवकांना सुरक्षित वाताव...

वणी उपविभागातील दक्षता व नियंत्रण

इमेज
वणी उपविभागातील दक्षता व नियंत्रण समितीच्या नियमित बैठका होणार कधी? आदिवासी महिला व वंचित घटकांच्या न्यायासाठी सक्रियतेची गरज बिरसा संदेश न्यूज  वणी प्रतिनिधी : वणी :- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजावरील अत्याचार रोखणे, पीडितांना न्याय मिळवून देणे तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी (एसडीओ) असून गटविकास अधिकारी (बीडीओ) सचिव म्हणून कार्य करतात. याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी), पोलीस निरीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी (सीओ) तसेच सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्या यांचा समितीत समावेश असतो. वणी उपविभागांतर्गत वणी, झरी-जामणी आणि मारेगाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी व वंचित समाज वास्तव्यास आहे. या भागात महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, जमिनीचे वाद, सामाजिक भेदभाव आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित विविध प्रकरणे वेळोवेळी समोर येत असतात. अशा परिस्थितीत दक्षता व नियंत्रण स...

मृग नक्षत्र सरले तरी पावसाचा पत्ता नाही; कपाशी पेरण्या

इमेज
मृग नक्षत्र सरले तरी पावसाचा पत्ता नाही; कपाशी पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेच्या गर्तेत बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च; पावसाअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले बिरसा संदेश न्यूज प्रतिनिधी वणी :- मृग नक्षत्र सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या आशा आता आभाळाकडे लागल्या आहेत.यंदा शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा साठवलेल्या पैशांतून बियाणे, खते आणि शेती मशागतीची तयारी पूर्ण केली आहे. मात्र पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतात बियाणे टाकणे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी प्रतीक्षा करत असून दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात पावसाचा उशीर झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे अतिरिक्त खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. काही भागात विहिरी व बोअरवेलचे पाणीही कमी होत असल्याने शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भ...

शिक्षणाअभावी आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून दूर जाण्याची भीत

इमेज
शिक्षणाअभावी आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून दूर जाण्याची भीती प्रतिनिधी वणी :- आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. मात्र आज अनेक गरीब आदिवासी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार शिक्षण घेणे कठीण होत आहे. सरकारी शाळांची संख्या कमी होत असताना खासगी शिक्षण संस्थांचे वाढते शुल्क अनेक कुटुंबांसाठी परवडणारे राहिलेले नाही. समाजातील विविध संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. परंतु त्याच निधीतून शैक्षणिक मदत केंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, वाचनालये आणि विद्यार्थी वसतिगृह उभारले गेले तर अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडू शकते. शिक्षणापासून वंचित राहिलेली पिढी समाजाला विकासाच्या प्रवाहापासून दूर नेऊ शकते, अशी चिंता समाजातील जाणकार व्यक्त करत आहेत. समाजातील प्रत्येक गावात "शिक्षण बचाव समिती" स्थापन करून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, पुस्तके, गणवेश आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी

इमेज
आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी पुढाकाराची गरज; सत्कारांपेक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर खर्च करा! विशेष प्रतिनिधी वणी :- आज आदिवासी समाजासमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद पडत आहेत किंवा त्यांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे खासगी शाळांचे जाळे वेगाने वाढत असून, त्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरावी लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिक्षण देणे परवडत नाही. समाजातील जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे की, आदिवासी समाजाचे भविष्य घडवायचे असेल तर केवळ सत्कार समारंभ, वाढदिवस, गौरव कार्यक्रम आणि मोठमोठे मेळावे घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठोस निधी उभारण्याची गरज आहे. समाजातील नेते, संघटना, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वसतिगृह सुविधा आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.अनेकदा एका दिवसाच्य...

नामकरण सोहळा संपन्न

इमेज
नामकरण सोहळा संपन्न : पेंदोर व मडावी परिवारात आनंदाचे वातावरण वणी प्रतिनिधी वणी :- सोमवार दिनांक २ जून २०२६ रोजी पेंदोर व मडावी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला चिरंजीवाचा नामकरण सोहळा उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. सौ. रत्नमाला दिनकर पेंदोर व सौ. सुनीता विठ्ठल मडावी यांचा नातू तसेच सोनू व दीपक यांचा चिरंजीव यांच्या नामकरण सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धार्मिक विधी, मंगलमय वातावरण आणि कुटुंबीयांच्या शुभेच्छांमध्ये बालकाचे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांनी बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेंदोर व मडावी परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शुभेच्छुक : पेंदोर परिवार व मडावी परिवार